माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं मुंबईतील रुग्णालयात निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज (बुधवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमाराला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

    देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरताना दिसत नाही. या लाटेत अनेकजण आपला जीव गमावत असल्याचं चित्र असून माजी खासदार आणि मंत्री एकनाथ गायकवाड यांचं थोड्या वेळापूर्वीच कोरोनामुळे निधन झालंय.

    महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं मुंबईतील रुग्णालयात निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज (बुधवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमाराला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    कोरोनाचा सध्या धुमाकूळ घालत असलेला दुसरा स्ट्रेन हा अतिशय भयंकर असून काही दिवसांतच रुग्णांची प्रकृती ढासळत असल्याचं दिसून आलंय. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची तब्येत वेगानं ढासळत गेली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.