ईडीच्या माध्यमातून एकनाथ खडसेंची सुडबुद्धीने आणि राजकीय हेतूने चौकशी सुरू; राष्ट्रवादीच्या ”या” नेत्याचा गंभीर आरोप

कनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नसल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील, असं भाजपला वाटत असेल. परंतू तो भाजपचा गैरसमज आहे. कुणीही या यंत्रणेला घाबरत नाही, असं म्हणत नवाब मलिक यांनी एकाप्रकारे भाजपला सूचक इशारच दिला आहे.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावरून राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी यावर भाष्य केलं आहे. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नसल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील, असं भाजपला वाटत असेल. परंतू तो भाजपचा गैरसमज आहे. कुणीही या यंत्रणेला घाबरत नाही, असं म्हणत नवाब मलिक यांनी एकाप्रकारे भाजपला सूचक इशारच दिला आहे.

    तसेच यंत्रणांचा दुरुपयोग करणं हे भाजपचं काम आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम बंगाल, युपी याठिकाणी असलेल्या विरोधकांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम या यंत्रणांच्या माध्यमातून केलं जात असल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

    त्याचप्रमाणे ज्या प्रकरणाबाबत ईडी खडसेंची चौकशी करत आहे. त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचं खच्चीकरण केलं होतं. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.

    खडसे 9 तासांच्या चौकशीनंतर कार्यालयाबाहेर

    दरम्यान, गुरूवारी 8 जूलै रोजी एकनाथ खडसे चौकशीसाठी सुमारे सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहिले होते. त्या दिवशी 9 तासांच्या चौकशीनंतर कार्यालयाबाहेर पडल्यानंतर खडसे यांनी प्रसार माध्यामांशी बोलणं टाळलं. त्यावेळी त्यांच्या वकिलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. वकिलांनी सांगितले की, ईडी जितक्या वेळा चौकशीसाठी बोलवेल तितक्या वेळा हजर राहणार असल्याचं आश्वासन एकनाथ खडसे यांनी दिलं असल्याचं सांगितलं होतं.