एकनाथ खडसे कन्येसह करणार राष्ट्रवादीत प्रवेश, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांची मोठी घोषणा

एकनाथ खडसे हे कन्या रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. २३ ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होतील. त्यामुळे खडसे समर्थकांना सकाळी १० वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) पक्षप्रवेशाबद्दलच्या चर्चांना आता विराम दिले आहे. स्वत: एकनाथ खडसेंनी मुलाखतीदरम्यान मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ खडसे आता भाजपाला रामराम ठोकायच्या तयारीत आहेत. ते व त्यांची कन्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्या (NCP) प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे काही वेळातच मोठी घोषणा करणार असल्याचे समजते आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे थोड्याच वेळात एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मोठी घोषणा करणा आहेत. त्यामुळे आता एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशांवरील चर्चेला विराम दिले गेले आहे. जयंत पाटील यांनी घोषणा केल्यानंतर एकनाथ खडसे तात्काळ भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे समजते आहे. तसेच २३ ऑक्टोबरला खडसे आपल्या मुलीसह मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश ( join NCP with his daughter) करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

एकनाथ खडसेंनी मुलाखतीमध्ये आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना ब्रेक लावला आहे. आज भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

एकनाथ खडसे हे कन्या रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. २३ ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा सोहळा होईल. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होतील. त्यामुळे खडसे समर्थकांना सकाळी १० वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

जयंत पाटील यांची मोठी घोषणा

जयंत पाटील यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत औपचारिक घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ते शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती जयांत पाटील यांनी दिली आहे.

 

प्रश्नचिन्ह (?) हटला

गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपाचे बडे नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराच्या प्रत्येक बातमीत प्रश्नचिन्ह येत होता. तो प्रश्नचिन्ह आता गायब झाला आहे. प्रश्नचिन्हासोबत बातम्यांच्या हेडींगसह बातमीत देखील संदिग्धता व्यक्त केली जात होती.

मात्र बातम्यांमधील तो प्रश्नचिन्ह (?) त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या ताज्या वृत्तानुसार नाहीसा झाला आहे एकनाथराव खडसे हे शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाणार प्रवेश करणार असल्यचे रा.कॉ.चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज जाहीर केले आहे.

एकनाथराव खडसे यांनी फोन करुन भाजपचा राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आम्ही स्वागत करत आहोत असे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

गेल्या कित्येक दिवसापासून भाजपचे नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे. खडसे यांच्या इच्छुक समर्थकांना देखील प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.