aknath khadase

भाजपचे ज्येष्ठ नेते हे अनेक महिन्यांपासून नाराज आहेत. त्यांची मनधरणी करण्यात भाजपचे पुढाकारी नेते अयशस्वी झाल्याचे दिसत आहे. वेळोवेळी खडसेंचे मनधरणी करुनही त्यांची नाराजी दूर करु शकले नाहीत. तसेच आता झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे दुखावले गेले होते. त्यामुळे एकनाथ खडसे पक्षांतर करणार असल्याची बातमी आणखी जोर धरु लागली होती.

मुंबई : मागील काही महिन्यांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. परंतु आता मिळालेल्या माहितीमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला आहे. याबाबत लवकरच राष्ट्रवादीकडून ( NCP )खडसेंच्या प्रवेशाबद्दल अधिकृत घोषणा (official announcement ) करण्यात येणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते हे अनेक महिन्यांपासून नाराज आहेत. त्यांची मनधरणी करण्यात भाजपचे पुढाकारी नेते अयशस्वी झाल्याचे दिसत आहे. वेळोवेळी खडसेंचे मनधरणी करुनही त्यांची नाराजी दूर करु शकले नाहीत. तसेच आता झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे दुखावले गेले होते. त्यामुळे एकनाथ खडसे पक्षांतर करणार असल्याची बातमी आणखी जोर धरु लागली होती. यावर खडसेंनी स्वतः पक्षांतर करण्याच्या वृत्ताला फेटाळले होते.

मात्र, आता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे. लवकरच खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान खडसेंसह आणखी कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार याची उत्सुकता लागली आहे.