ईडीचा एकनाथ खडसेंना दणका! ५ कोटी ७३ लाखांची मालमत्ता जप्त

Bhosri MIDC जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची ईडीने (ED) गेल्या महिन्यात तब्बल ९ तास चौकशी केली होती. पुण्यातील भोसरी MIDC भूखंड व्यवहार प्रकरणात जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली होती.

  मुंबई : राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांना ईडीने दणका दिला आहे. खडसेंची मालमत्ता ईडीने जप्त (property seized) केली आहे. तब्बल ५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ही जप्त करण्यात आलेली मालमत्ता लोणावळा (Lonavla) आणि जळगाव (Jalgaon) येथील आहे.

  Bhosri MIDC जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची ईडीने (ED) गेल्या महिन्यात तब्बल ९ तास चौकशी केली होती. पुण्यातील भोसरी MIDC भूखंड व्यवहार प्रकरणात जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली होती.

  ७३ लाखांची संपत्ती केली जप्त

  खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी एका निवेदनाद्वारे १४ दिवसांची वेळ मागितली होती. दरम्यान, ईडीने आता खडसेंची ५ कोटी ७३ लाखांची संपत्ती जप्त केली आहे. अजूनही काही मालमत्ता जप्त केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  ईडी कार्यलायात तब्बल ९ तास सुरू होती चौकशी

  एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तब्बल ९ तासाच्या चौकशीनंतर ईडी कार्यलायतून एकनाथ खडसे बाहेर पडले आहेत. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली. खडसेंसोबतच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मात्र त्या उपस्थित राहिल्या नाहीत.

  काय आहे प्रकरण?

  फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७५ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.