aknath khadase

खडसेंना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी त्यावरही बोलणे टाळले आहे. पक्षाबद्दल सुरु असलेल्या चर्चेवर उत्तर देताना त्यांनी नो कमेंट असे म्हणत ते मुक्ताईनगरच्या दिशेने रवाना झाले. चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसें बाबत वक्तव्य केले होते की, चुकत असेल तर थोबाडीत मारा, पण त्या दांडक्यासमोर जाऊ नका, माणसाला भावभावना असतात. तो व्यक्त करतो. माझे नाथाभाऊंना एवढंच म्हणणं आहे की, तुम्ही आमचे पालक आहात.

मुंबई : एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) नाराजीमुळे भाजपामध्ये धुसपूस निर्माण झाली आहे. यामुळे भाजपवर (BJP) नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) घेतलेल्या बैठकीमुळे राजकीय घडामोडीत चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंना पक्ष बदलणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी यावर उत्तर देणे टाळले आहे.

तसेच खडसेंना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी त्यावरही बोलणे टाळले आहे. पक्षाबद्दल सुरु असलेल्या चर्चेवर उत्तर देताना त्यांनी नो कमेंट असे म्हणत ते मुक्ताईनगरच्या दिशेने रवाना झाले. चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसें बाबत वक्तव्य केले होते की, चुकत असेल तर थोबाडीत मारा, पण त्या दांडक्यासमोर जाऊ नका, माणसाला भावभावना असतात. तो व्यक्त करतो. माझे नाथाभाऊंना एवढंच म्हणणं आहे की, तुम्ही आमचे पालक आहात. बंद खोलीमध्ये दोन थोबाडीत मारा चालेल ना, सारखे तुम्हाला दांडके कशाला लागतात असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

एकनाथ खडसे शरद पवारांना भेटून राष्ट्रवादीत जाण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला असून, खडसे-पवार भेटीवर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.