eknath khadse

एकनाथ खडसे( Eknath Khadse)यांचे जावई गिरीश चौधरी यांना १५ जुलैपर्यंत ईडी कोठडी(Ed Custody To Girish Choudhary) सुनावण्यात आली आहे. मुंबईतील पीएमएलए कोर्टाने तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

    मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे( Eknath Khadse)यांचे जावई गिरीश चौधरी यांना १५ जुलैपर्यंत ईडी कोठडी(Ed Custody To Girish Choudhary) सुनावण्यात आली आहे. मुंबईतील पीएमएलए कोर्टाने तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. हवाला प्रकरणात ही कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने ९ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने केवळ तीन दिवसांची कोठडी दिली. पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणात हवाला व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे.

    खडसेंची ईडीकडून चौकशी सुरू
    पाच दिवसांपूर्वी ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्याने खळबळ उडाली होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे, गिरीश चौधरी यांच्या नावाने भोसरी येथे एमआयडीसी जागा खरेदी केल्याचे प्रकरण गाजले होते. या प्रकरणी खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर करून कमी किंमतीत ही जागा खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तसेच या प्रकरणी झोटींग समिती देखील नेमण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागत होता. तसेच त्यानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी सुरू देखील सुरू झाली.

    फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप
    भाजपावर खडसेंचे आरोप एकनाथ खडसेंना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांचे अनेकदा भाजप नेत्यांसोबत खटके उडाले. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काही नेत्यांवर गंभीर आरोप त्यांनी केले. त्यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करतांना तुम्ही ईडी लावल्यास आम्ही सिडी लावू असे खडसेंनी सांगितले होते.