नारायण राणेंच्या विधानात तथ्य नाही; नगरविकास मंत्री शिंदेचा मोठा खुलासा

राणे स्वत: युती सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. राज्याशी निगडीत मोठा निर्णय किंवा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारवेच लागते. माझेच नाही, कोणत्याही खात्याचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच सामुहिक निर्णय घेत असतात. हे राणेंना माहीत असेल. एवढेच नव्हे तर ते उद्योग मंत्री आहेत. उद्या त्यांना मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो पंतप्रधानांना विचारूनच घ्यावा लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

    मुंबई : मला शिवसेनेत आणि मंत्री म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य आहे. राणेंच्या विधानात काही तथ्य नाही. हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, अश्या शब्दात नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीखुलासा केला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, या केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे इन्कार करत राणेंचा समाचार घेतला आहे. माध्यमांशी बोलताना शिंदे  यानी सांगितले की, मी पक्षात समाधानी आहे. राणेंनी जे सांगितले त्यात तथ्य नाही. ते पूर्णपणे चुकीचे आहे. मला जर स्वातंत्र्य नसते तर मी हे निर्णय घेऊ शकलो नसतो. मातोश्री काय आणि उद्धव साहेब काय कोणीही माझ्या कामात हस्तक्षेप करत नाहीत, असे शिंदे म्हणाले.

    राणे स्वत: युती सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. राज्याशी निगडीत मोठा निर्णय किंवा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारवेच लागते. माझेच नाही, कोणत्याही खात्याचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच सामुहिक निर्णय घेत असतात. हे राणेंना माहीत असेल. एवढेच नव्हे तर ते उद्योग मंत्री आहेत. उद्या त्यांना मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो पंतप्रधानांना विचारूनच घ्यावा लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

    राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. कालचे विधान हा त्याचाच एक भाग आहे, असे ते म्हणाले. कोव्हिडच्या काळात आम्ही विकासाची अनेक कामे केली. अनेक निर्णय घेतले. विकासही सुरू ठेवला आणि कोरोनाची परिस्थितीही नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या खात्याने अनेक कामे केली. मला स्वातंत्र्य नसते तर मी ही कामे करू शकलो असतो काय?, असा सवालही त्यांनी केला.