eknath shinde

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde Reaction about Narayan Rane) यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

    केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde Reaction about Narayan Rane) यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत केलेले वक्तव्य अतिशय संतापजनक आणि निंदनीय आहे. महाराष्ट्राला थोर आणि मोठी परंपरा आहे. आत्तापर्यंत कधीही कुणीही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असं वक्तव्य केलं नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे हे वक्तव्य आहे. याचा निषेध करावा तितका कमी आहे. सध्या राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता वाद अधिक चिघळू न देता केलेलं वक्तव्य दुरुस्त करुन राणेंनी महाराष्ट्राची माफी मागावी.

    भाजपाच्या जन आशिर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी आता नाशिक पोलिस आयुक्तांनी करवाईचे आदेश दिले आहेत. या संदर्भात नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून राणे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यात्रे दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘कानाखाली वाजवली असती’ अस वक्तव्य राणे यांनी केलं होतं.