…त्यांनी कुठून शोध लावला, नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यात काहीही तथ्य नाहीये ; एकनाथ शिंदे यांचा पलटवार

नारायण राणे यांनी कुठून शोध लावला ते मला माहिती नाही, मी माझ्या पक्षात समाधानी आहे. तसेच मला माझ्या डिपार्टमेंटमध्ये पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणून मी नगरविकास विभागाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला यूनिफाईड डीसीपीआरचा निर्णय राज्याच्या हितासाठी आणि सर्व सामान्य लोकांच्या हितासाठी घेऊ शकलो. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

  मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. एकनाथ शिंदे मातोश्रीच्या आदेशाशिवाय एकही सही करु शकत नाहीत. ते केवळ सही पुरतेच मंत्री असून, शिवसेनेला कंटाळले आहेत. असं वक्तव्य नारायण राणे यांनी केल्यानंतर त्यांनी कुठून शोध लावला मला माहिती नाही, असा पलटवार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

  …त्यांनी कुठून शोध लावला

  नारायण राणे यांनी कुठून शोध लावला ते मला माहिती नाही, मी माझ्या पक्षात समाधानी आहे. तसेच मला माझ्या डिपार्टमेंटमध्ये पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणून मी नगरविकास विभागाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला यूनिफाईड डीसीपीआरचा निर्णय राज्याच्या हितासाठी आणि सर्व सामान्य लोकांच्या हितासाठी घेऊ शकलो. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

  नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यात काहीही तथ्य नाहीये

  शिंदे यांनी पुढे म्हटलं की, माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग यशस्वीपणे आम्ही पुढे नेत आहोत आणि त्याचं लवकरच लोकार्पण होणार आहे. त्यामुळे माझ्या विभागामध्ये आणि पक्षामध्ये मी समाधानी आहे. तसेच नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यात काहीही तथ्य नाहीये. कारण मला जर स्वातंत्र्य नसतं तर मी निर्णय घेऊच शकलो नसतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

  काय म्हणाले होते नारायण राणे ?

  वसईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. एकनाथ शिंदे मातोश्रीच्या आदेशाशिवाय एकही सही करु शकत नाहीत. ते केवळ सही पुरतेच मंत्री असून, शिवसेनेला कंटाळले आहेत. त्यांना लवकर आमच्यात घेऊ. मी त्यांना फोन करणार आहे, ते आले तर स्वागतच, असा गौप्यस्फोट करत, मनात आणले तर ठाकरे सरकारचं विसर्जन करु, असा दावा राणेंनी केला.