election 2020

गेल्या सात महिन्यांपासून मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका जानेवारी महिन्यापासून घ्यायला सुरुवात करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय. त्यानुसार राज्यातील १४ हजार ३१४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, औरंगाबाद आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांच्या निवडणुकाही जानेवारी महिन्यात एकाच दिवशी घेण्याचं नियोजन निवडणूक आयोग करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे

राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती आणि ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. मात्र कोरोना संकटामुळे निवडणूक घेणे शक्य नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक नेमून कारभार सुरू ठेवण्यात आला आहे. अशा ठिकाणच्या निवडणुका घेण्याचा विचार सध्या सुरू आहे.

गेल्या सात महिन्यांपासून मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका जानेवारी महिन्यापासून घ्यायला सुरुवात करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय. त्यानुसार राज्यातील १४ हजार ३१४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, औरंगाबाद आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांच्या निवडणुकाही जानेवारी महिन्यात एकाच दिवशी घेण्याचं नियोजन निवडणूक आयोग करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

कोरोना काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सध्या प्रशासकामार्फत सुरू आहे. ग्रामपंचायतीवर प्रशासकीय अधिकारी असावा की राजकीय नेता असावा, हा वाद गेल्या काही महिन्यांपासून जोरदार रंगत आहे. यावरून वेगवेगळे मतप्रवाह असून सध्या कायद्यातील तरतुदीनुसार मुदत संपलेल्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती केली गेलीय. मात्र आता निवडणुका घेऊन हा वाद कायमचा संपवण्याचा चंग निवडणूक आयोगानं बांधल्याचं सांगितलं जातंय.

शहरांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्यामुळे एकाच दिवशी महापालिकांच्या निवडणुका व्हाव्यात, यासाठी निवडणूक आयोग आग्रही असल्याची माहिती मिळेतय. साधारण जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ग्रामपंचायतीच्या आणि तिसऱ्या आठवड्यात महापालिकांच्या निवडणुका पार पडतील, अशी चर्चा आहे.