ओबीसींचा इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही ; पंकजा मुंडे यांचा इशारा

येत्या २६ जूनला राज्यभरात भाजपकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केलीय. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला इशारा देण्यात आलाय.

    मुंबई :  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिलाय. ओबीसींची इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार पंकजा मुंडे यांनी केलाय.

    येत्या २६ जूनला राज्यभरात भाजपकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केलीय. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला इशारा देण्यात आलाय.

    इतकंच नाही तर २६ जूनला ओबीसी समाजाचा संताप आम्ही रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतलाय. संपूर्ण राज्यात 26 तारखेला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केलीय. तसंच न्यायालयातही दाद मागणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.