2019-20 या काळात शिवसेनेला करोडोंचे उत्पन्न, इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून खुलासा

प्रादेशिक पक्षांमध्ये, टीआरएस १३०.४६ कोटी रुपयांच्या उत्पन्नासह अव्वल आहे. ही रक्कम सर्व पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या १४.८६ टक्के इतकी आहे. शिवसेनेला १११.४०३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर वायएसआर- काँग्रेसने ९२.७३९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

    मुंबई : राजकीय पक्षांनी आपल्याला किती प्रमाणात आणि कोणत्या माध्यमातून देणगी मिळाली आहे याची माहिती द्यावी लागते. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने 2019-20 या काळात इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून कोणत्या प्रादेशिक पक्षाला किती प्रमाणात निधी मिळाला आहे याची माहिती दिली आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये सर्वाधिक देणगी मिळालेल्या यादीत शिवसेनेचा दुसरा क्रमांक आहे. तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.

    आम आदमी पक्ष, डीएमके, जनता दल युनायटेड, शिवसेना यांच्यासह १४ प्रादेशिक पक्षांनी त्यांना निवडणूक रोख्यांच्या रूपात मिळलेली देणगी जाहीर केली आहे. सन २०१९-२० या वर्षात मिळालेल्या या रोख्यांची किंमत ४४७.४९ कोटी रुपये आहे. शिवसेनेला १११.४० कोटींचे निवडणूक रोखे मिळाले आहेत.

    प्रादेशिक पक्षांमध्ये, टीआरएस १३०.४६ कोटी रुपयांच्या उत्पन्नासह अव्वल आहे. ही रक्कम सर्व पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या १४.८६ टक्के इतकी आहे. शिवसेनेला १११.४०३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर वायएसआर- काँग्रेसने ९२.७३९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

    २०१९-२० या काळात एकूण विक्री झालेल्या ३४२७ कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉन्डपैकी भाजपाला ७४ टक्के म्हणजे २५५५ कोटी रुपये निधी मिळाला आहे. २०१७-१८ या वर्षामध्ये भाजपला ७१ टक्के निधी इलेक्टोरल बॉन्डमधून मिळाला. निधी मिळाला होता. आता त्यात तीन टक्क्यांची वाढ झाली असून तो ७४ टक्क्यावर पोहोचला आहे. सन २०१७-१८ साली भाजपाला २१० कोटी रुपये मिळाले होते. त्यात आता तब्बल दहा पटीने वाढ होऊन २५५५ कोटी रुपये मिळाले आहेत.