केवळ १० हजार रुपयांत बुक करा कार, दरवर्षी करा ३ लाखांची बचत

मुंबईतील स्टार्ट अप कंपनी स्टॉर्म मोटर्स यांनी ही अनोखी ऑफर आणलीय. या कंपनीची नवी इलेक्ट्रिक कार स्ट़ॉर्म R3 साठी केवळ १० हजार रुपये बुकिंग करता येणार आहे. देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा या कंपनीनं केलाय. स्टॉर्म R3 ही दोन दारं असलेली कार आहे. या कारला तीन चाकं आहेत. या कारच्या मागच्या बाजूला एक चाक आणि पुढे दोन चाकं असणार आहेत. 

  एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडत असताना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर सरकार भर देतंय.अधिकाधिक नागरिकांनी ई व्हेईकल्स वापरावीत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत. त्यात अशी कार बनवणाऱ्या कंपनीनंही एक अनोखी ऑफर बाजारात आणल्यामुळे ग्राहकांमध्ये सध्या चैतन्य निर्माण झालंय.

  मुंबईतील स्टार्ट अप कंपनी स्टॉर्म मोटर्स यांनी ही अनोखी ऑफर आणलीय. या कंपनीची नवी इलेक्ट्रिक कार स्ट़ॉर्म R3 साठी केवळ १० हजार रुपये बुकिंग करता येणार आहे. देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा या कंपनीनं केलाय. स्टॉर्म R3 ही दोन दारं असलेली कार आहे. या कारला तीन चाकं आहेत. या कारच्या मागच्या बाजूला एक चाक आणि पुढे दोन चाकं असणार आहेत.

  मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू यासारख्या मेट्रो सिटीजना डोळ्यासमोर ठेऊन या कारची निर्मिती करण्यात आलीय. या कारमध्ये एलईडी लाईट्स, ड्युअल टोन आणि सनरुफची रचना करण्यात आलीय.

  असा आहे आकार

  या कारची लांबी २९०७ मिमी तर रुंदी १४०५ मिमी आहे. याची उंची १५७२ मिमी असून १८५ मिमीचा ग्राऊंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. या कारचं वजन ५५० किलो आहे.

  बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंज 

  या कारमध्ये १३ किलोवॅटची मोटर आहे. एक फास्ट चार्जरही कारसोबत दिला जाणार आहे. केवळ २ तासात या कारची ८० टक्के बॅटरी चार्ज होऊ शकते. पूर्ण चार्जिंग व्हायला या बॅटरीला ३ तास लागतात. १५ ऍम्पिअर क्षमता असणाऱ्या घरघुती प्लगवरही या कारचं चार्जिंग होऊ शकतं.

  किंमत किती असेल?

  या कारची किंमत साधारण ४.५ लाख रुपये असेल, असं सांगितलं जातंय. त्यामुळेच ही सर्वात स्वस्त कार असेल, असा दावा केला जात आहे.

  खर्चात होणार बचत

  इतर कारच्या तुलनेत याचा मेंटेनन्सचा खर्च ८० टक्के कमी असल्याचा दावा कंपनीनं केलाय. ३ वर्षात इंधन, मेन्टेनन्स आणि इतर खर्च मिळून ३ लाखांची बचत होऊ शकेल, असं कंपनीनं म्हटलंय.