मुंबईत ‘सीएसआर फंडा’मधून लसीकरणावर भर; ८ लाख लसींचे डोस होणार उपलब्ध

तिस-या लाटेची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून लसीकरणावर भर दिला जातो आहे. त्यासाठी मुंबईतील विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून लसीकरणाला वेग देण्यात येत आहे.

    मुंबई (Mumbai) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (the third wave of corona) पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका लसीकरणावर (Mumbai Municipal Corporation) भर देत आहे. लसीकरण मोहिमेला (the vaccination campaign) वेग आणण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरु केला आहे; मात्र केंद्र सरकारकडून (the central government) लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे यात अडचणी येत आहेत. त्यामुळे यावर तोडगा म्हणून महानगरपालिका ‘सीएसआर’ फंडातून (the CSR fund) लस साठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे.

    तिस-या लाटेची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून लसीकरणावर भर दिला जातो आहे. त्यासाठी मुंबईतील विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून लसीकरणाला वेग देण्यात येत आहे. मुंबईतील काही कंपन्यांकडून मिळून पालिकेला देणगी म्हणून सुमारे आठ लाख डोस मिळणार आहेत. या डोसचा वापर दाटीवाटीने वसलेल्या मोठ्या झोपडपट्यांत केला जाणार आहे.

    वरळी, परळ, शिवडी, प्रतीक्षा नगर, गोवंडी तसेच अन्य झोपडपट्टी परिसरात दाटीवाटीने वस्ती आहे. बहुतांश भागात बाजार असल्याने लोकांची सतत गर्दी आणि वर्दळ असते. या परिसरात लोकसंख्या अधिक असली तरी तुलनेने लसीकरण कमी झाले आहे. त्यामुळे सीएसआर फंडातून मिळणाऱ्या लसीच्या माध्यमातून या भागात लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे दोन लाख लसी प्राप्त झाल्या आहेत. काही कंपन्यांनी सीएसआरद्वारे पालिकेला लस दान केली आहे. अनेक कंपन्या लस दान करण्यासाठी पुढाकार घेत आहेत असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.