माेकळ्या भुखंडांना अतिक्रमणांचा विळखा, काेराेनाच्या काळात मुंबईत अतिक्रमणे वाढली

अतिक्रमणांवरील कारवाईसाठी पाेलीस संरक्षणाची गरज असते. मात्र पाेलीसही आता काेराेनाच्या काळातील लाॅकडाऊनमधील नाकाबंदी आणि संरक्षणाच्या कामासाठी तैनात आहेत. त्यामुळे अतिक्रमणांवरील कारवाईत माेठा खंड पडला असल्याचे पालिकेच्या अधिकार्यांने सांगितले. पालिकेच्या रिमाेवल ऑफ एन्क्राेचमेंट डिपार्टमेंट अ‌ॅपवर नागरिकांना अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणांबाबत तक्रारी करण्याची व्यवस्था पालिकेने केली आहे.

    मुंबई – मुंबईत माेठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढत आहेत. काेराेनाच्या काळात कारवाई हाेत नसल्याने तसेच त्यांना अभय मिळत असल्याने अतिक्रमणांची संख्या 20 हजाराहून अधिक झाली आहे. मुंबईतील पालिकेच्या आणि शासकीय भुखंडावर झपाट्याने अतिक्रमणे उभी राहिली असल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्यांनी दिली.

    अतिक्रमणांवरील कारवाई काेराेनाच्या काळात थंडावली आहे. त्याचा फायदा घेवून अतिक्रमणे वाढत आहेत. दीड वर्षापासून काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेची सर्व यंत्रणा कामाला जुंपली आहे. काेराेनाच्या तिसर्या लाटेचा धाेका असल्यामुळे पालिका प्रशासनाने पूर्ण लक्ष काेराेनावर केंद्रीत केले आहे. त्यामुळे अतिक्रमणांवरील कारवाई जवळजवळ ठप्प आहे. त्याबाबत तक्रार आली तरी कारवाई करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही.

    अतिक्रमणांवरील कारवाईसाठी पाेलीस संरक्षणाची गरज असते. मात्र पाेलीसही आता काेराेनाच्या काळातील लाॅकडाऊनमधील नाकाबंदी आणि संरक्षणाच्या कामासाठी तैनात आहेत. त्यामुळे अतिक्रमणांवरील कारवाईत माेठा खंड पडला असल्याचे पालिकेच्या अधिकार्यांने सांगितले. पालिकेच्या रिमाेवल ऑफ एन्क्राेचमेंट डिपार्टमेंट अ‌ॅपवर नागरिकांना अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणांबाबत तक्रारी करण्याची व्यवस्था पालिकेने केली आहे. ही प्रणाली महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनधिकृत बांधकामांचे किंवा अतिक्रमणांचे फोटो तक्रारदाराने संकेतस्थळावर किंवा अॅपवर टाकण्याची व्यवस्था केली हाेती. काेराेनामुळे ही सर्व यंत्रणा ढेपाळली असल्याचे दिसून येत आहे.

    गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत तब्बल 20 हजाराहून अधिक तक्रारी आल्या आहेत. यातील सुमारे 400 अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली झाल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्यांनी दिली. कोरोना काळात मुंबईत किती अवैध बांधकामांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मागील दीड वर्षापासून कोरोना विरोधात पालिकेचा लढा सुरु आहे. त्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात कोरोना उपाययोजनांच्या कामांत पालिकेची यंत्रणा व्यस्त आहे. त्याचा फायदा उठवत भूमाफिया, झोपडीदादांनी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे केली आहेत.

    पालिकेच्या सभागृहात यावर नगरसेवकांनी आवाजही उठवला मात्र त्यावर काेणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून आले. पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात शासकीय आणि पालिकेचे भुखंड अनेक ठिकाणी माेकळे आहेत. त्या भुखंडांवर अतिक्रमणे वाढल्याचे पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले. मालाड, कांदिवली, बाेरिवली, गाेरेगाव, गोवंडी, मानखुर्द, घाटकाेपर,चेंबूर, विक्राेळी, कुर्ला परिसरात साकीनाका येथील खैरानी रोड, तसेच शहर भागातूनही अवैध बांधकामांच्या 20 हजाराहून अधिक तक्रारी आल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्यांनी दिली. भागात सर्वांत जास्त अवैध बांधकामे आहेत.