The bodies of 49 people were found in the sea 600 crew members safe Naval rescue operation begins

चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक संसार उद्ध्वस्त झाले आणि अनेकांचे प्राण गेले. त्यातच, बॉम्बे हायवरील तेल उत्खनन करणऱ्या पी 305 हे बार्ज चक्रीवादळात बुडाले. या दुर्घटनेप्रकरणी यलोगेट पोलिसांनी 5 कंपन्यांना समान्स बनावले आहे.

    मुंबई : चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक संसार उद्ध्वस्त झाले आणि अनेकांचे प्राण गेले. त्यातच, बॉम्बे हायवरील तेल उत्खनन करणऱ्या पी 305 हे बार्ज चक्रीवादळात बुडाले. या दुर्घटनेप्रकरणी यलोगेट पोलिसांनी 5 कंपन्यांना समान्स बनावले आहे.

    या प्रकरणी 10 जणांनी जबाब नोंवदले आहेत. 28 मृतदेहांची ओळख पटली नसून त्यांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुर्घटनेप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लाव इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यलोगेट पोलिसांनी पी 305 तराफावरील वाचलेल्या कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळाल्यापासून बार्ज बुडेपर्यंतचा घटनाक्रम पोलिसांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नौदलामुळे सुरक्षितरित्या बचावलेले शेख सध्या ताडदेव अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहेत.

    तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केल्याने बॉम्बे हायजवळील तेल विहिरींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तयार केलेला पी 305 हा तराफा समुद्रात बुडाला.