ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, माझी कोविड चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करु इच्छितो, की सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपापली कोरोना चाचणी करुन घ्यावी.

मुंबई : राज्यात कोरोनाचा (coronavirus) पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचा प्रसार वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाची लागण सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकाण्यांना देखील झाली आहे. अनेक राजकारणींनी कोरोनावर मात केली आहे. तर काहींचा मृत्यू झाला आहे. आता राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याविषयी त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे.


काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, माझी कोविड चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करु इच्छितो, की सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी आपापली कोरोना चाचणी करुन घ्यावी. प्रत्येकाने सरक्षित राहा आणि काळजी घ्या. असे आवाहन नितीन राऊत यांनी केले आहे.