राज ठाकरेंच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; मध्यरात्रीच ‘कृष्णकुंज’ च्या प्रवेशव्दारावर फुलांची सजावट

राज ठाकरे यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' बंगल्याच्या प्रवेशव्दारावर कार्यकर्त्यांनी फुलांची सजावट केली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी सर्वाना भेटीगाठी साठी घरी न येण्याचे आवाहन केले आहे.  मात्र तरीही कार्यकर्त्यांनी उत्साहीपणे 'कृष्णकुंज' बंगल्यावर फुलांची सजावट केली आहे.

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ बंगल्याच्या प्रवेशव्दारावर कार्यकर्त्यांनी फुलांची सजावट केली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी सर्वाना भेटीगाठी साठी घरी न येण्याचे आवाहन केले आहे.  मात्र तरीही कार्यकर्त्यांनी उत्साहीपणे ‘कृष्णकुंज’ बंगल्यावर फुलांची सजावट केली आहे.

    मनसेकडून खास व्हिडीओ प्रसारित

    राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला नेहमी शुभेच्छा देण्यासाठी ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागते. परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा करणार नाहीत. मात्र यावेळी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेकडून खास व्हिडीओ प्रसारीत करण्यात आला आहे.

    शुभेच्छा देण्यासाठी कृष्णकुंजवर येऊ नये

    राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मध्यरात्रीपासूनच कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसत आहे. दादरमधल्या कृष्णकुंज बंगल्याच्या प्रवेशव्दाराला मध्यरात्री कार्यकर्त्यांनी फुलांची सजावट केली. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, शुभेच्छा देण्यासाठी कृष्णकुंजवर येऊ नये, स्वत:च्या घरीच थांबून सुरक्षीत रहावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.  त्यानी दोन दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांना पत्र लिहून आवाहन केले आहे.  तसेच व्टिटही केले होते. त्यात म्हटले होते की,  “मागील वर्षीप्रमाणे हे वर्ष देखील बिकट आहे. कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सुटलेला नाही. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल. त्यामुळे माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा. जिथे आहात, तिथे सुरक्षित रहा. कुटुंबीयांची आणि आसपासच्या लोकांची काळजी घ्या.