shatabdi hospital
प्रतिकात्मक फोटो

कांदिवली येथील शताब्दी रुग्णालय(shatabdi hospital) परिसरात सुपरस्पेशालिटी रुग्णालय(super speciality hospital) उभारण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे.

मुंबई: कांदिवली येथील शताब्दी रुग्णालय(shatabdi hospital) परिसरात सुपरस्पेशालिटी रुग्णालय(super speciality hospital) उभारण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. येथे १० मजली इमारत व ३२५ खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

कांदिवली येथील शताब्दी रुग्णालय हे पश्चिम उपनगरातील लोकांसाठी महत्वाचे रुग्णालय आहे. त्यामुळे या शताब्दी रुग्णालयात सुपरस्पेशलिटी रुग्णालय उभारण्याबाबत पालिकेने हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र विविध विभागाच्या परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू होती. आता पर्यावरण विभागाने मंजुरी दिल्याने या रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. शताब्दी रुग्णालय परिसरात नवीन १० मजली इमारतीत ३२५ खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करत काम सुरु करण्यात येईल. रुग्णालयात काडिॅयोलॉजी, न्यूरोसर्जरी , सिटीस्कॅन अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

बांधकामात अडथळा ठरणारी ८४२ झाडे कापणार
कांदिवली पश्चिम येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी रुग्णालय) हे सुपरस्पेशलिटी रुग्णालयाची इमारत उभारताना अडथळा ठरणा-या ८४२ झाडे कापावी लागणार आहेत. ही झाडे रुग्णालय परिसरात पुनर्रोपित करण्यात येणार आहे.