Environment Minister Aditya Thackeray briefly defended; A major accident was averted

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज एका विचित्र अपघातातुन थोडक्यात बचावले आहेत. सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वरील मोठा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेतून आदित्य ठाकरे बचावले आहेत.

    मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज एका विचित्र अपघातातुन थोडक्यात बचावले आहेत. सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वरील मोठा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेतून आदित्य ठाकरे बचावले आहेत.

    बैठक सुरु असतानाच अचानक बाहेर स्लॅब कोसळला. सह्याद्री अतिथीगृहातील चार नंबरच्या हॉल बाहेरील हा स्लॅब आहे. अचानक स्लॅब पडल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. यावेळी मंत्र्यांची चांगलीच धावपळ झाली.

    मोठ्या झुंबरसह हा पीओपी स्लॅब कोसळला. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाडण्याच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची त्यांच्या विभागाच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बैठक सुरु होती.

    यावेळी सभागृहा बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. अचानक झालेल्या या दूर्घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, स्लॅब कोसळला त्याठिकाणी कुणी उपस्थित असते तर मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेनंतर

    सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या दुर्घटनेनंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. यानंतर ही बैठक पार पडली अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.