एमपीएससी परीक्षेबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची प्रतिक्रीया, म्हणाले की…

एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळात आता टीका व्हायला सुरुवात झाली आहे. या आत्महत्येनंतर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर चांगलाच आक्रमक झालाय, नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्यामुळे राज्य सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एमपीएससीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

    मुंबई : एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळात आता टीका व्हायला सुरुवात झाली आहे. या आत्महत्येनंतर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर चांगलाच आक्रमक झालाय, नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्यामुळे राज्य सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एमपीएससीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

    दरम्यान, स्वप्नील लोणकर या एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याने विरोधी पक्षातर्फे ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही आत्महत्या नव्हे तर सरकारने केलेला खून आहे, असं म्हणत सरकारला धारेवर धरलं आहे.

    आदित्य ठाकरे काय म्हणाले?

    महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात बोलताना म्हटले आहे की, मंत्रिमंडळाची बैठक होणार असून सर्वच विषयांवर या बैठकीत चर्चा होईल. तसेच एमपीएससीवरही बैठकीत चर्चा होणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवलं आहे.

    विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घडलेली घटना ही दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त करत एमपीएससीला स्वातंत्र्य हवेच पण स्वैराचार नको, अशा शब्दात सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर नेमकी काय चर्चा होणार आणि त्यातून नेमका काय तोडगा निघणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.