पश्चिम मार्गावरील प्रवाशांची जाचातून सुटका; मध्यच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक तपासूनच ठरवा प्रवासाचा बेत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT, Mumbai) येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद (Down Fast) सेवा ठाणे आणि कल्याण (Thane and Kalyan) स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या (Down Slow) मार्गावर वळविल्या जातील.

  मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) मुंबई विभागात (Mumbai Division) आज देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. परिणामी लोकल रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल (Time Table) होणार आहे.

  मेन मार्ग

  ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT, Mumbai) येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद (Down Fast) सेवा ठाणे आणि कल्याण (Thane and Kalyan) स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या (Down Slow) मार्गावर वळविल्या जातील. ठाणे आणि कल्याण स्थानकांमधील सर्व स्थानकांवर थांबतील. या सेवा त्यांच्या गंतव्यस्थानावर वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

  कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सर्व स्थानकांवर थांबतील. या सेवा मुलुंड इथून अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा त्यांच्या वेळापत्रकापेक्षा १० मिनिटं उशिरानं पोहोचतील.

  अप हार्बर मार्गावर मेगब्लॉक

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगब्लॉक असेल.

  वांद्रे/गोरेगाव करिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी /बेलापूर /पनवेलकरिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  पनवेल, कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील

  पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीदरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

  हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक

  पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही जम्बो ब्लॉक घेण्यात येणार नाही.