मुंबई रेप प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना; गुप्तांगात लोखंडी सळई घुसवल्याने महिलेचे आतडे आले होते बाहेर

मृत ३२ वर्षीय महिलेवर ९ सप्टेंबरला रात्री उशीरा बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. महिलेचे आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही, असे राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितले होते. मात्र उपचारादरम्यान अखेर या महिलेचा मृत्यू झाला. या गुन्हाच्या लवकरात लवकर तपास करुन तात्काळ आरोपपत्र दाखल करु, असा विश्वासही यावेळी हेमंत नगराळे आणि नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला.

    मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. साकिनाका बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे आणिसह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी संशसीय म्हणून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

    मृत ३२ वर्षीय महिलेवर ९ सप्टेंबरला रात्री उशीरा बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. महिलेचे आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही, असे राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितले होते. मात्र उपचारादरम्यान अखेर या महिलेचा मृत्यू झाला. या गुन्हाच्या लवकरात लवकर तपास करुन तात्काळ आरोपपत्र दाखल करु, असा विश्वासही यावेळी हेमंत नगराळे आणि नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला.

    दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच शुक्रवारी रात्री मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वतः साकीनाका पोलीस स्टेशन गाठले आणि संपूर्ण घटनेची चौकशी केली. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात फक्त एक आरोपी समोर आला आहे. पोलीस संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करत आहेत.

    या घटनेची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करा आणि पीडितेच्या कुटुंबियांना मदत करा अशा आशयाचे पत्र राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना लिहिले आहे. अध्यक्षा रेखा शर्मा यांनी एक व्हिडीओच्या माध्यमातून ही माहिती दिली.