दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूनंतरही न्याय मिळत नाही; चित्रा वाघ यांच्याकडून खंत व्यक्त

चित्रा वाघ दीपाली चव्हाण प्रकरणावर संतापल्यात. दीपाली चव्हाण मृत्यूनंतर देखील तिचा छळ केला जातो आहे. खरतर दिपालीला न्यायची गरज आहे. समितीकडून आलेला अहवालानंतर चित्रा वाघ आपली भूमिका स्पस्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

    मुंबई : २३ मार्चला मेळघाटातील हरिसाल येथे वनविभागात आर एफ ओ पदावर कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. तशी चिठ्ठी सुद्धा दीपाली लिहिली होती. सद्या या प्रकरणाला वेगळं वळण लागल आहे.

    दरम्यान या प्रकरणी विनोद शिवकुमार याला पोलिसांनी अटक केली होती. तर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी याना निलंबित करण्यात आलं होतं. या संदर्भात चौकशी करीता समिती गठीत करण्यात आली. या समितीकडून नुकताच श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार याना क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती आहे.

    अहवालानंतर चित्रा वाघ भूमिका स्पष्ट करणार

    मात्र या संदर्भात दुसरी बैठक होणार आहे. त्याअंती निर्णय दिला जाणार आहे. मात्र चित्रा वाघ दीपाली चव्हाण प्रकरणावर संतापल्यात. दीपाली चव्हाण मृत्यूनंतर देखील तिचा छळ केला जातो आहे. खरतर दिपालीला न्यायची गरज आहे. समितीकडून आलेला अहवालानंतर चित्रा वाघ आपली भूमिका स्पस्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.