पाचव्या समन्सनंतरही अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर होणार नाहीत, वकीलांमार्फत देणार उत्तर

पाचव्या नोटीसनंतरही देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर रहाणारनसुन आपल्या वकीलामार्फत उत्तर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशीच नोटीस त्यांचा मुलगा ऋषिकेशलाही पाठवण्यात आली होती.

    ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लाँडरिंग प्रकरणी पाचवा समन्स जारी केला. व ईडीने अनिल देशमुख यांना आज बुधवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, या पाचव्या नोटीसनंतरही देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर रहाणारनसुन आपल्या वकीलामार्फत उत्तर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशीच नोटीस त्यांचा मुलगा ऋषिकेशलाही पाठवण्यात आली होती.

    सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची याचिका फेटाळल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. वास्तविक, अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून आजारपणामुळे बळजबरीची कारवाई करू नये, अशी मागणी केली होती, पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. मात्र, तीन सदस्यीय खंडपीठाने म्हटले आहे की, अनिल देशमुख आपील करण्यास मोकळे आहेत. कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अनिल देशमुख अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात जाऊ शकतात.

    मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांना पाचवा समन्स पाठवला आहे. ईडीला त्यांचा जबाब नोंदवायचा आहे. ईडीची कारवाई चुकीची असल्याचे सांगून देशमुख मागील सुनावणीला जाण्यास नकार देत आहेत. त्यांचा मुलगा ऋषिकेश आणि पत्नी यांनाही समन्स बजावण्यात आले होते, पण तेसुध्दा सुनावणीकरीता हजर राहिले नाहीत.