Even Fadnavis had used threatening language when he was the Chief Minister Criticism of Sanjay Raut

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(maharashtra cm uddhav thackeray) यांच्या ‘सामना’तील  मुलाखती नंतर आता शिवसेना नेते आणि विरोधी पक्ष यांच्यात थेट सामना रंगला आहे. इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते अशी टीका विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) यांनी केली. त्यांच्या या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत(sanjay raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

एक वर्षात काय केले? पुढची दिशा काय? सामनाच्या मुलाखतीत  यावर मुख्यमंत्र्यांना यावर  काहीच सांगता आले नाही. इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते ते संविधानाची शपथ सुद्धा विसरले. नाक्यावरील भांडणात करायची वक्तव्यं वर्षपूर्तीला करायची? मुख्यमंत्र्याची मुलाखत मला वाटली नाही. खरं तर मुख्यमंत्र्यांची सामनामध्ये आलेली मुलाखत ही प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही असी टीका फडणवीस यांनी केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलखतीत कुठेही ते असं  बोलले असे मला वाटत नाही. मात्र,  फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारविरोधात बोलणाऱ्यांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ही भाषा तर भयंकर धमकीची होती. त्यांची अशी अनेक वाक्य आहेत जी धमकी वाटू शकतात असही संजय राऊत म्हणाले.

सत्तेचा वापर करुन तुम्ही धमकी देऊ पहात होतात का? असाही प्रश्न संजय राऊत उपस्थित  केला आहे. उद्धव ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेना पक्ष प्रमुख आहेत हे कुणी विसरु नये असंही संजय राऊत म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस यांनी सामनामधली मुलाखत वाचली आणि पाहिली असेल तर मुख्यमंत्र्यांनी धमकीची भाषा नेमकी कुठे वापरली यावर अंडरलाइन केलं असतं तर मला त्यावर उत्तर देता आलं असतं. पण, त्यांनी असं काही सांगितलंच नाही. जर एखादी केंद्रीय तपास यंत्रणा दडपशाही करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे लागत असेल तर त्यांना उत्तर देणं मुख्यमंत्र्यांचं काम आहेच.” खोटेपणा करुन विरोधकांनी आरोप करु नये असंही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.