Even if it was a little late ... there is little to commend the promptness shown by the Mumbai Police

ताडदेव पोलिसांना सोमवारी १९ वर्षीय एका मुलीला आत्महत्येपासून परावृत्त यश मिळाले. म्हाडा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक तरुणी आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची माहिती ताडदेव पोलिसांना मिळाली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन तरुणीचे समुपदेशन करून तिचा जीव वाचवला.

    मुंबई : ताडदेव पोलिसांना सोमवारी १९ वर्षीय एका मुलीला आत्महत्येपासून परावृत्त यश मिळाले. म्हाडा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक तरुणी आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची माहिती ताडदेव पोलिसांना मिळाली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन तरुणीचे समुपदेशन करून तिचा जीव वाचवला.

    पीडिताच्या जबानीनुसार, सहा महिन्यांपूर्वी तरुणीचे लग्न झाले होते. परंतु, तिचा पती आणि सासरची मंडळी तिचा मानसिक आणि शारिरीत छळ करत हाेते. कित्येकवेळा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रारही दाखल केली परंतु, काहीही उपयोग झाला नाही. अखेर वैतागून सोमवारी तिने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला.

    तिचा पती कामावर जाण्यासाठी निघताच बाजूच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्र चिकित्सालयाची कर्मचारी प्रिया गावडे मुंबई सेंट्रलच्या ताडदेव परिसरातील एका म्हाडा इमारतीच्या पाचव्या मजल्यावर चढली होती आणि उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि त्यांच्या पथकाने मुलीचा समजावून आत्महत्येपासून परावृत्त केले.