सगळ्याच गोष्टी जाहीर करता येत नाहीत, अमित शाहांच्या गुगलीमुळे महायुतीत संभ्रम

या भेटीबाबत विचारणा केली असता, सगळ्याच गोष्टी सार्वजनिक करता येऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अमित शाह यांनी दिलीय. त्यामुळे भेट झाली होती की नव्हती, याचं कुठलंही स्पष्ट उत्तर न देता त्यांनी संभ्रमात अधिकच भर घालणं पसंत केल्याचं चित्र निर्माण झालंय. अशी भेट झालीच नव्हती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक केला होता. मात्र गृहमंत्री अमित शाह यांनी वेगळं विधान करून गोंधळात भर टाकलीय. 

    महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. विशेषतः अगोदर सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयु्क्त परमबीर सिंग यांनी टाकलेला लेटर बॉम्ब यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अंतर्गत संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चेमुळे वेगळ्या शक्यतांची चर्चाही सुरु झालीय.

    या भेटीबाबत विचारणा केली असता, सगळ्याच गोष्टी सार्वजनिक करता येऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अमित शाह यांनी दिलीय. त्यामुळे भेट झाली होती की नव्हती, याचं कुठलंही स्पष्ट उत्तर न देता त्यांनी संभ्रमात अधिकच भर घालणं पसंत केल्याचं चित्र निर्माण झालंय. अशी भेट झालीच नव्हती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक केला होता. मात्र गृहमंत्री अमित शाह यांनी वेगळं विधान करून गोंधळात भर टाकलीय.

    महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचं सरकार असून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी पवारांनी जाणीवपूर्वक ही भेट घेतल्याचीही चर्चा आहे. राष्ट्रवाी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते प्रफुल्ल पवार हे गुजरातमध्ये अमित शाहांना त्यांच्या निवासस्थानी भेटल्याची चर्चा होती. गुजरातमधील स्थानिक माध्यमांत याच्या बातम्या झळकल्या होत्या.

    राष्ट्रवादीने या भेटीचा केलेला इन्कार आणि गृहमंत्री अमित शाहांनी केलेलं संदिग्ध विधान यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालंय.