Excitement over finding terrorists in Dharavi! Were the state's ATS asleep? Three questions to BJP's Thackeray government

दिल्लीत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पाकिस्तानात झाले असून दाऊदचा भाऊ अनिस अहमद त्यांना पैसा पुरवत होता, असा आरोप त्यांच्यावर आहे. नवरात्र, रामलीला आणि उत्सव काळात घातपात घडवणाऱ्या आणि त्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केली. त्यापैकी जान मोहम्मद शेख आणि समीर या दोघांना महाराष्ट्रातून अटक केली. त्यातल्या एकाला तर धारावीतून अटक करण्यात आली.

    मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत येऊन जान मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर या मुद्यावरून वातावरण तापू लागले आहे. भाजपाकडून या प्रकरणी तीव्र टीका करण्यात आली. हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचे एटीएस झोपले होते का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातील पोलिस काय करत होते? असा सवाल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे. यासंदर्भात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

    दिल्लीत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पाकिस्तानात झाले असून दाऊदचा भाऊ अनिस अहमद त्यांना पैसा पुरवत होता, असा आरोप त्यांच्यावर आहे. नवरात्र, रामलीला आणि उत्सव काळात घातपात घडवणाऱ्या आणि त्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केली. त्यापैकी जान मोहम्मद शेख आणि समीर या दोघांना महाराष्ट्रातून अटक केली. त्यातल्या एकाला तर धारावीतून अटक करण्यात आली.

    विशिष्ट वर्गासाठी राज्य सरकार मवाळ भूमिका तर घेत नाही ना? अदखलपात्र गुन्ह्यात केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे, पत्रकारांना हात नाही पाय लावू असे म्हणणारे किंवा राज्यातल्या विद्यमान आमदाराविरोधात लुकआऊट नोटीस काढणारे आमचे पोलिस या दहशतवाद्यांच्या बाबतीत काय करत होते? याची माहिती राज्याच्या पोलिसांना, गृहमंत्र्यांना होती का? होती तर त्यावर त्यांनी काय भूमिका घेतली? असे सवाल भाजपने उपस्थित केले आहेत.

    सरकारने काढलेल्या आदेशाच्या विरोधामध्ये आंदोलने करण्यापेक्षा किंवा बाकिच्या काही गोष्टी करण्यापेक्षा सरकारला, पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. माहिती गोळा करत असताना थेट अटक करण्याचे अधिकार देखील पोलिसांना आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केलेली आहे. एटीएसचे या घटनेवर लक्ष आहे. पोलिसांना पोलिसांच्या् पद्धतीने तपास करू दिला पाहीजे. त्यातून सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

    जेव्हा पोलिसांचं लक्ष राज्यकर्ते नको त्या विषयात घालायला लावतात, तेव्हा गंभीर विषयांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते हे दिसून आले आहे. पोलिस खात्याचे कर्तृत्व मोठे आहे. पण सौदेबाजी, वसुलीबाजी करताना आमच्या पोलिसांच्या डोक्यावर मिऱ्या वाटाव्यात असे राज्य सरकार वागते, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते.

    - आशीष शेलार, आमदार, भाजपा