विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी राजकारणात यावे; राज ठाकरेंचे आवाहन

विविध क्षेत्रातील क्रियाशील, सृजनशील आणि तज्ज्ञांनी राजकारणात यावे, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे, असेही ते म्हणाले. ऑनलाइन नोंदणीसाठी नागरिकांनी या संकेतस्थळावर जावे किंवा ऑफलाइन नोंदणीसाठी जवळच्या पक्ष कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले.

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने हे अभियान सुरु राहणार आहे. राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवाजीपार्कमध्ये कुटुंबीयांसोबत या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात केली.

    या सदस्यनोंदणी अभियानाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील लोकांना राजकारणात येण्याचे आवाहन केले. पुढच्यावर्षी 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक ताकत आणि जनाधार भक्कम करण्याच्या दृष्टीने या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. नागरिकांकडूनही मनसेच्या या मोहीमेला प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.

    विविध क्षेत्रातील क्रियाशील, सृजनशील आणि तज्ज्ञांनी राजकारणात यावे, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे, असेही ते म्हणाले. ऑनलाइन नोंदणीसाठी नागरिकांनी या संकेतस्थळावर जावे किंवा ऑफलाइन नोंदणीसाठी जवळच्या पक्ष कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले.

    पक्षाच्या वेबसाइटवर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचा पर्याय आहे. मनसेचा सदस्य होण्यासाठी नाव, पत्ता, फोटो आणि संपर्क क्रमांकाची माहिती भरावी लागेल. फॉर्ममध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षाचे सदस्य आहात का? हे विचारण्यात आले असून, 2021 ते 2023 या दोन वर्षांसाठी मनसेचे सदस्यत्व मिळणार आहे.