लहान मुलांसाठीच्या लसींच्या ट्रायल्सला परवानगी देण्यास तज्ज्ञांचा विरोध

सिरमने भारताच्या औषध नियंत्रकांकडे सोमवारी ही परवानगी मागितली होती. सिरमला एकूण ९२० लहान मुलांवर कोवोवॅक्स या करोना प्रतिबंधक लसीची चाचणी करायची होती. त्यापैकी ४६० मुलं १२ ते १७ वर्षे वयोगटातली होती. तर उरलेली २ ते ११ वर्षे वयोगटातली होती. १० ठिकाणी ह्या चाचण्या होणार होत्या.

    सिरम इन्स्टिट्युटच्या कोवोवॅक्स या करोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुलांवरील चाचणीसाठी परवानगी देण्याचं तज्ज्ञांनी नाकारलं आहे. या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीसाठीची परवानगी नाकारण्यात आली आहे.

    सिरमने भारताच्या औषध नियंत्रकांकडे सोमवारी ही परवानगी मागितली होती. सिरमला एकूण ९२० लहान मुलांवर कोवोवॅक्स या करोना प्रतिबंधक लसीची चाचणी करायची होती. त्यापैकी ४६० मुलं १२ ते १७ वर्षे वयोगटातली होती. तर उरलेली २ ते ११ वर्षे वयोगटातली होती. १० ठिकाणी ह्या चाचण्या होणार होत्या.

    मात्र भारताच्या औषध नियंत्रक मंडळाच्या तज्ज्ञांच्या समितीने कोवोवॅक्सच्या चाचण्यांना परवानगी नाकारली. ह्या लसीला अद्याप कोणत्याही देशाने लहान मुलांसाठी मान्यता दिली नसल्याचं कारण देण्यात आल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.