ए, सोना माझ्याशी असं बोलू नको ना? मुंबई पोलिसांनी मजेशीर पोस्टच्या माध्यमातून सांगितले मास्कचे महत्त्व

वास्तविक मुलीने न बोलण्याचं कारण हेच आहे की, मुलाने तोंडावर मास्क लावलेला नसतानाही तो तिला हाय म्हणतो आहे, उत्तरादाखल मुलगीही त्याला सल्ला देताना म्हणते की, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको कारण सध्या कोरोना काळ सुरू आहे.

  मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai Police) सोशल मीडिया (Social Media) आपल्या मजेशीर पोस्टमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. ते आपल्या मजेशीर पोस्टच्या माध्यमातून लोकांना संदेश देत सावध करण्याचा प्रयत्न करत असतात. पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी आपल्या इंस्टाग्राम (Instagram) हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट (Video Share) केला आहे. ज्यात लोकांना मास्क (Mask) घालणं किती अत्यावश्यकच आहे याविषयी सांगितलं आहे. या पोस्टमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी दिसत आहे. ज्यात मुलगा मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे पण ती मुलगी त्याच्याशी बोलण्यास साफ नकार देते.

  वास्तविक मुलीने न बोलण्याचं कारण हेच आहे की, मुलाने तोंडावर मास्क लावलेला नसतानाही तो तिला हाय म्हणतो आहे, उत्तरादाखल मुलगीही त्याला सल्ला देताना म्हणते की, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको कारण सध्या कोरोना काळ सुरू आहे. मुंबई पोलिसांचा हाच प्रयत्न आहे की, लोकांना मास्कचा वापर करण्यासाठी अधिकाधिक उद्युक्त करणं. मास्क घालूनच इतरांशी संवाद साधण्याचा प्रत्येकाने करावा हा त्यामागचा प्रामाणिक हेतू आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

  मास्क लावूनच बोला, मास्क काढल्यानंतर लोकांचे हाव-भाव बदलतात आणि आपल्यालाही या इमेजमध्ये दिसेल की या मुलासारखी आपल्यालाही इतरांसमोर लाजिरवाणे वाटायला नको.

  मुंबई पोलिसांची ही मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो आहे. असे मजेशीर मीम्स आणि पोस्टच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल.

  explained the importance of masks to people through funny posts by mumbai police