लालबागच्या साराभाई मेन्शनमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट

लालबागच्या (Lalbagh) साराभाई मेन्शनमध्ये (Sarabhai Mansion) आज सकाळी गॅस सिलेंडरचा (gas cylinder) भीषण स्फोट (Blast)  झाला. यामध्ये १६ जण गंभीर जखमी झाले असून चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुंबई : मुंबईतील  (Mumbai) लालबागच्या (Lalbagh) साराभाई मेन्शनमध्ये (Sarabhai Mansion) आज सकाळी गॅस सिलेंडरचा (gas cylinder) भीषण स्फोट (Blast)  झाला. यामध्ये २० जण गंभीर जखमी झाले असून चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबईतील के.ई.एम (K.E.M.) आणि ग्लोबल (Global Hospital) रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न कार्य असलेल्या घरात ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली असता, ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचसोबतच पाण्याचे दोन मोठे टँकरही पाठविण्यात आले आहेत.