Breaking : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळली स्फोटकांनी भरलेली कार

मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक असून त्यांच्या अँटिलिया घराबाहेर ही कार उभी आहे. सध्या या ठिकाणी पोलिस आणि श्वानपथकं पोहोचलं असून या गाडीत जिलेटिनच्या २०-२५ कांड्या असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

    मुंबई : जगातील श्रीमंत व्यक्तीमध्ये ज्या मुकेश अंबानी यांचा समावेश होतो. त्या अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक असून त्यांच्या अँटिलिया घराबाहेर ही कार उभी आहे. सध्या या ठिकाणी पोलिस आणि श्वानपथकं पोहोचलं असून या गाडीत जिलेटिनच्या २०-२५ कांड्या असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.