४.९ टक्के वाढणार निर्यात; चवथ्या तिमाहीचा अंदाज

आर्थिक वर्ष २०१९-२० च्या मार्चमधील तिमाहीत वाणिज्यिक वस्तूंची निर्यात ७४. ९अब्ज डॉलर होती. त्यातही गैर तेल वस्तुंची निर्यात ६५. ९ अब्ज डॉलर होती. चालू आर्थिक वर्षात सकल निर्यात २९७. ४ अब्ज डॉलर राहण्याचा अंदाज असला तरी तो गेल्या वर्षीच्या तुलनेत १०. ८ टक्के कमी राहण्याची शक्यता आहे.

    मुंबई:  मार्चमध्ये संपुष्टात येणाऱ्या चवथ्या तिमाहीत वस्तूंची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.९टक्क्यांनी वाढून ७८. ६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज एक्झिम बँकेने व्यक्त केला आहे. तथापि, वर्षबरात सकल निर्यात व्यवसाय २७९. ४ अब्ज डॉलरपर्यंत राहण्याची शक्यता असून तो वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ११ टक्के कमी असू शकतो असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात गैर इंधन निर्यात एक वर्षापूर्वीच्या याच काला‌वधीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढून तो ७३.९ अब्ज डॉलरपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

    गतवर्षीच्या तुलनेत १०. ८ टक्के घट
    यापूर्वी आर्थिक वर्ष २०१९-२० च्या मार्चमधील तिमाहीत वाणिज्यिक वस्तूंची निर्यात ७४. ९अब्ज डॉलर होती. त्यातही गैर तेल वस्तुंची निर्यात ६५. ९ अब्ज डॉलर होती. चालू आर्थिक वर्षात सकल निर्यात २९७. ४ अब्ज डॉलर राहण्याचा अंदाज असला तरी तो गेल्या वर्षीच्या तुलनेत १०. ८ टक्के कमी राहण्याची शक्यता आहे. वर्षभरात पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत आलेल्या घसरणीमागे जागतिक बाजारात पेट्रोलियम उत्पादनांच्या मागणीत झालेली घट कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. कोरोना साथरोगामुळे वाहतूक आणि पुरवठा क्षेत्रात इंधनाची मागणी घटली होती. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत वाणिज्यिक निर्यातीत३६. ७ टक्क्यांची घट झाली होती. एक वर्षापूर्वी पहिल्या तिमाहीत आयातीतही५२. ४ टक्के घट झाली होती.