sanjay raut

संजय राऊत म्हणाले की. कंगना तरुण आहे. तरुणांनी राग व्यक्त केला पाहिजे. त्यांचा राग मनात दाबला गेला तर स्फोट होतो. राग व्यक्त करणे म्हणजे चांगल्या मानसिकतेचे दर्शन आहे. फक्त त्यात विकृती नको.

अभिनेत्री कंगना रणौतने(kangana ranawat) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर परत एकदा निशाणा साधला आहे. मुंबईत गुंडाराज असल्याचा आरोप कंगनाने केेला आहे.तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हटले आहे. साहिल चौधरीला अटक झाली त्यानंतर कंगनानं ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.तसेच काँग्रेसला सवाल केला आहे. कंगनाच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये(sanjay raut in press conference) प्रत्यु्त्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की. कंगना तरुण आहे. तरुणांनी राग व्यक्त केला पाहिजे. त्यांचा राग मनात दाबला गेला तर स्फोट होतो. राग व्यक्त करणे म्हणजे चांगल्या मानसिकतेचं दर्शन आहे. फक्त त्यात विकृती नको.

दरम्यान, मुंबईतील कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यांना आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे.  संजय राऊत यांनी आपण बाजू मांडणार असल्याचे सांगितले. तसेच कोणी महाराष्ट्राची बदनामी करणार असेल तर षंढासारखं गप्प बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

संजय राऊत पुढे म्हणाले, मी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारा एका सामान्य कार्यकर्ता आहे. एक शिवसैनिक आहे.  हे बाळकडू आम्हाला  छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सगळ्यांनी दिलं आहे. महाराष्ट्राची बदनामी कोणी करत असेल, आमच्या नेत्यावर चिखलफेक करत असेल तर उसळून उठलं पाहिजे. आम्ही षंढासारखे गप्प बसणार नाही. उद्धव ठाकरे यांचीही तीच भूमिका आहे. व्यक्तिगत स्वार्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करु नका, केली तर आम्ही उसळून उठू, असे संजय राऊत यांनी सांगितलेे.