प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे इयत्ता पाचवी ते आठवीसाठी नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी १ ते ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. https://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

मुंबई (Mumbai).  महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे इयत्ता पाचवी ते आठवीसाठी नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी १ ते ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. https://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

बऱ्याच जणांना काही कारणास्तव शिक्षण घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी राज्य मंडळाकडून मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळांतर्गत पाचवी ते आठवीला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना १ ते ३१ डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी अर्ज करता येणार होता. पण कोरोनामुळे प्रवेश घेण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेता या विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यानुसार विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी १ ते ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्र अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये २ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत जमा करायचे आहेत. तसेच संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे ५ फेब्रुवारीपर्यंत जमा करायची आहे. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना https://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध केल्या असून, त्या वाचून अर्ज भरावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी फार्म १७ भरण्यास मुदतवाढ
२०२१ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेस खासगीरित्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म १७) भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्काने ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज व शुल्क भरण्यासाठी ११ते २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर मूळ कागदपत्रे १२ ते २७ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना शाळा, संपर्क केेंद्र किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायचे आहेत. त्याचप्रमाणे प्रथम व द्वितीय मुदतवाढ दिली असताना प्राप्त झालेल्या अर्जातील दुरुस्त्या १ ते १० जानेवारीदरम्यान विभागीय मंडळामार्फत करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी शाळेमार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आाले आहे.