मुंबईतील एम पश्चिम विभागात मान्सूनसाठी अतिरिक्त दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित, लोकांच्या तक्रारी होणार दूर

‘एम पश्चिम’ विभागातील चेंबूर परिसरातील आपत्कालीन नियंत्रण कक्षासाठी २५२६-४७-७७ हा अतिरिक्त दूरध्वनी क्रमांक (Number for help in monsoon) कार्यान्वित करण्यात आला आहे.

    मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या(BMC) ‘एम पश्चिम’ विभागातील चेंबूर परिसरातील आपत्कालीन नियंत्रण कक्षासाठी २५२६-४७-७७ हा अतिरिक्त दूरध्वनी क्रमांक (Number for help in monsoon) कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांना मान्सूनमध्य़े संपर्कासाठी हा क्रमांक असणार आहे.

    सध्य़ा (वॉर रुम) मध्ये २५२८-४०-०० हा दूरध्वनी क्रमांक कार्यरत आहे. हा क्रमांक ‘कोविड वॉर रुम’ व आपत्कालीन विभाग दोन्हींकरीता वापरण्यात येत आहे. मात्र मान्सूनच्या वेळी आपत्कालीन विभागामध्ये बरेच कॉल येत असतात. त्यामुळे या एका दूरध्वनी क्रमांकावर विविध ठिकाणांहून संपर्क साधला जात असल्याने हा दूरध्वनी क्रमांक व्यग्र लागू शकतो. त्यामुळे विभाग कार्यालयाद्वारे एक अतिरिक्त दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.