Extreme steps taken by employees due to non-receipt of salary for 3 months; Suicide of two ST employees in Jalgaon and Ratnagiri
प्रतिकात्मक फोटो

मागील ३ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत चालले आहे. वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव आणि रत्नागिरीतील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

मुंबई :  थकित वेतन मिळावे यासाठी एसटी कामगार संघटनेने पुकारलं असताना कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचललले आहे. जळगाव (jalgon)आणि रत्नागिरीतील (ratnagiri) दोन एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या(ST Worker Suicide) केली आहे.

मागील ३ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत चालले आहे. वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव आणि रत्नागिरीतील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

जळगाव येथील मनोज चौधरी (manoj chaudhari) यांनी मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे  कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते. ते वाहक पदावर कार्यरत होते. मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकारला जबाबदार धरले आहे. या घटनेनेनंतर कर्मचाऱ्यांनी जळगाव डेपो बंद ठेवत निषेध व्यक्त केला.

तर, रत्नागिरीतही पांडुरंग गदडे (panduranag gadade) या एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. ही हत्या असल्याचा आरोप गडदे यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

कोरोनाच्या संकटकाळातही एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरीकांची सेवा करत होते. अशा परिस्थितीत त्यांचा वेतन रखडल्याने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वेतन न मिळाल्याने कर्माऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. यामुळे अनेक कर्मचारी नैराश्यात आले आहेत.