भारतात फेसबुक बंद होणार, पुढचा नंबर कोणाचा ?; जयंत पाटील यांनी दिले संकेत…

खरंच, फेसबुक आणि ट्विटरवर बंदी येणार का?" असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर जयंत पाटलांनी पेट्रोल दरवाढीच्या मुद्द्यावरून सोशल मीडियाने उठवलेला आवाज दाबण्याचा हा प्रयत्न नाही ना, तर ट्विटर आणि फेसबुकनंतर पुढचा नंबर कोणाचा असे संकेत त्यांनी दिले आहेत. इंधन दरवाढीच्याविरुद्धच्या धोरणाला सामाजिक माध्यमातून तीव्र विरोध झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    नवी दिल्ली :  केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नव्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्यासाठी देण्यात येणारी मुदत उलटून गेल्याने फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यांच्या बंदी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम बंद होणार असल्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केले आहेत.

    दरम्यान देशात फक्त ‘ कू ‘ या ॲपने नव्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब केला आहे. मात्र या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब न करणाऱ्या कंपनींवर अजूनही बंदीची टांगती तलवार आहे. फेसबुकने मात्र केंद्र सरकारकडे ६ महिन्यांची मुदत वाढ मागितली आहे. त्यामुळे तूर्तासतरी फेसबुक बंद होण्याची शक्यता कमीच आहे. याबाबत जयंत पाटलांनी ट्विट करून आपले मत मांडले आहे. ”

    खरंच, फेसबुक आणि ट्विटरवर बंदी येणार का?” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर जयंत पाटलांनी पेट्रोल दरवाढीच्या मुद्द्यावरून सोशल मीडियाने उठवलेला आवाज दाबण्याचा हा प्रयत्न नाही ना, तर ट्विटर आणि फेसबुकनंतर पुढचा नंबर कोणाचा असे संकेत त्यांनी दिले आहेत. इंधन दरवाढीच्याविरुद्धच्या धोरणाला सामाजिक माध्यमातून तीव्र विरोध झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.