परदेशातील महाराष्ट्रीयन लोकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने विमानांना परवानगी द्यावी – फडणवीस

मुंबई अनेक देशांमध्ये महाराष्ट्रीयन नागरिक अडकून पडले असताना विमान उतरू देण्यास महाराष्ट्र सरकार परवानगी देत नसल्याने त्यांचे मायदेशी परतणे कठीण होऊन बसले आहे. राज्य सरकारने विमानांना

 मुंबई  अनेक देशांमध्ये महाराष्ट्रीयन नागरिक अडकून पडले असताना विमान उतरू देण्यास महाराष्ट्र सरकार परवानगी देत नसल्याने त्यांचे मायदेशी परतणे कठीण होऊन बसले आहे. राज्य सरकारने विमानांना परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आपल्या भारतवासियांना या काळात मायदेशी परत येता यावे आणि आपल्या स्वकियांसोबत त्यांना राहता यावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत मिशनची अंमलबजावणी सुरू केली आहे. अशात अनेक राज्य सरकारे त्यांच्या राज्यात विमान उतरू देण्यास परवानगी देत असल्याने ते परतू शकत आहेत. महाराष्ट्रात मात्र केंद्र सरकार तयार असतानाही केवळ राज्य सरकारच्या परवानगी अभावी हे शक्य होत नाही. यासंदर्भात आपल्याकडे अनेक नागरिकांकडून विनंती प्राप्त झाल्या आहेत. त्यासंदर्भात केंद्र सरकारशी सुद्धा आपण पत्रव्यवहार केला. मात्र, मुख्य अडचण ही राज्य सरकारच्या परवानगीची आहे. अखिल अमिराती मराठी इंडियन (आमी परिवार) यांनी कळविल्यानुसार, दुबई, अबुधाबी येथे ६००० हून अधिक महाराष्ट्रीयन अडकून आहेत. जर्मनीत १०० हून अधिक महाराष्ट्रातील विद्यार्थी, युक्रेनमध्ये ३०० हून अधिक विद्यार्थी, तसेच ऑस्ट्रेलिया व इतर देशांतही अनेक महाराष्ट्रातील नागरिक/विद्यार्थी अडकले आहेत. ही परवानगी राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.