वंदे भारत मिशनच्या तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रीयन बांधव मायदेशी परतणार – फडणवीस

मुंबई: आखाती देशांमध्ये अडकून असलेल्या महाराष्ट्रीयन बांधवांना परत येण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी सातत्याने आपण संपर्कात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

 मुंबई: आखाती देशांमध्ये अडकून असलेल्या महाराष्ट्रीयन बांधवांना परत येण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी सातत्याने आपण संपर्कात असल्याचे  देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज संयुक्त अरब अमिरातीतील महाराष्ट्रीयन मराठी बांधवांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

 आजही परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्याशी संपर्क साधून विनंती केली.महाराष्ट्र सरकारने मधल्या काळात विमानांच्या लँडिंगला परवानगी नाकारल्या त्यामुळे काही अडचणी आल्या होत्या.पण,आता परवानगी देण्यात आली आहे.आता १५ ला कतार,१६ला ओमान,१९तारखेला अबुधाबी येथून विमाने महाराष्ट्रात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. वंदे भारत मिशनच्या तिसर्‍या टप्प्यात त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपले महाराष्ट्रीय बांधव परतू शकतील, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. या चर्चेत महाराष्ट्र मंडळ, कुवैत, आमी परिवार युएई, जीएमबीएफ ग्लोबल, दुबई,महाराष्ट्र मंडळ कतार, महाराष्ट्र मित्र,महाराष्ट्र मंडळ ओमान यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.