फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला : सचिन सावंत

मुंबई मेट्रो प्रकल्पाभोवती मागचे पाच वर्षे भाजपने हीन राजकारण केलं आणि फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला. तसेच हे मी कागदोपत्री सिद्ध करुन दाखवेल, असा दावा सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे.

 मुंबई: मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घेतला. त्यानंतर राज्य सरकारने प्रस्तावित केलेली जागा केंद्राची असल्याचं पत्रच केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आलं. त्यानंतर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा जोरदार सामना सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबई मेट्रो प्रकल्पाभोवती मागचे पाच वर्षे भाजपने हीन राजकारण केलं आणि फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला. तसेच हे मी कागदोपत्री सिद्ध करुन दाखवेल, असा दावा सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे.

मेट्रो कारशेडच्या जागेबाबत केंद्र सरकारनं राज्याला पत्र पाठवण्यामागं हीन राजकारण आहे. त्या जागेवर १९६९ पासून राज्य सरकारचा अधिकार आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच केंद्र सरकार आता या जागेवर दावा सांगत आहे, असा आरोप सावंत यांनी केला आहे.

मेट्रो ३ आणि ६ प्रकल्पाबाबत राज्य सरकारने कारशेड कांजूरमार्गला उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा आराखडा फडणवीस मुख्यमंत्री असतानाच आखला होता, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे. तसेच अश्विनी भिडे यांनी राज्य सरकारला तेव्हा पत्र पाठवलं होतं. मेट्रो ३ कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा सर्वात उपयुक्त आहे. ही जागा कारशेडसाठी देण्यात यावी, असं त्या पत्रात नमूद करण्यात आल्याचंही सावंत म्हणाले.