फडणवीसही एके दिवशी मातोश्रीवर जातील; संजय राऊत यांचा दावा

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांत शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे तर दुसरीकडे, सत्ताधारी आणि विरोधकांमधील कलगीतुरा काही संपण्याचं नाव घेत नाही. फडणवीसांनी केलेल्या टीकेवर राऊत यांनीही फडणवीस हे एक दिवस मातोश्रीवर जातील, अशा शब्दात पलटवार केला.

    मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांत शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे तर दुसरीकडे, सत्ताधारी आणि विरोधकांमधील कलगीतुरा काही संपण्याचं नाव घेत नाही. फडणवीसांनी केलेल्या टीकेवर राऊत यांनीही फडणवीस हे एक दिवस मातोश्रीवर जातील, अशा शब्दात पलटवार केला.

    माझ्यामुळे सत्ता गेली याचे फडणवीसांना दुःख आहे, त्यामुळे आपण त्यांना समजून घेतले पाहिजे. फडणवीसांना पुढची तीन-साडे तीन वर्षे आमच्यावर टीकाच करायची आहे. सध्या राज्यात कोरोना, महागाई आणि इतर संकट असताना विरोधी पक्षाने सरकारच्या सोबत काम करणे गरजेचे आहे. राजकारण नंतर करता येते. सध्या असे वाद उकरुन का काढले जात आहेत?

    टीका करणे हे विरोधकांचे काम आहे, त्यामुळे फडणवीसांची टीका गांभीर्याने घेत नाही असेही राऊत म्हणाले. फडणवीसांच्या पवार आणि खडसेंच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी राज्यातला विरोधीपक्ष आता जमिनीवर येतो आहे, असा टोमणाही त्यांनी लगावला. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो, वैचारिक मतभेद असू शकतात. राजकारणात या गोष्टीच होतच असतात, अशी टीप्पणीही त्यांनी केली.

    हे सुद्धा वाचा
    हे सुद्धा वाचा
    हे सुद्धा वाचा