ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा भुलभुलैय्या, मात्र आम्हाला राजकारण करायचे नाही :  ओबीसी नेते आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ

न्यायालयाने ओबीसींच्या लोकसंख्येची विचारणा केली जात होती. त्यामुळे जनगणनेचे आकडे केंद्राकडे आहेत. आमच्याकडे नाहीत. तुम्ही केंद्राला आदेश दिले तर आम्ही तुम्हाला हे आकडे देऊ शकतो, असे आम्ही न्यायालयात सांगितले होते, असे ते म्हणाले.

    मुंबई: ओबीसी आरक्षणावरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस भुलभुलैय्या करत आहेत. आम्हाला त्यावर राजकारण करायचे नाही, असे मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यानी व्यक्त केले आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज पदोन्नतीतील आरक्षणाबाबत बैठकीच्या वेळी छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या महत्वाच्या मंत्र्याची उपस्थिती होती. त्यावेळी ओबीसी आरक्षणच्या मुद्यावर देखील चर्चा करण्यात आली. त्या नंतर छगन भुजबळ यानी माध्यमांशी संवाद साधला.

    जनगणनेचे आकडे केंद्राकडे

    ते म्हणाले की, न्यायालयाने ओबीसींच्या लोकसंख्येची विचारणा केली जात होती. त्यामुळे जनगणनेचे आकडे केंद्राकडे आहेत. आमच्याकडे नाहीत. तुम्ही केंद्राला आदेश दिले तर आम्ही तुम्हाला हे आकडे देऊ शकतो, असे आम्ही न्यायालयात सांगितले होते, असे ते म्हणाले.

    या विषयावर आता सरकारला काय कायदेशीर निर्णय घ्यावे लागतील यावर सकारात्मक चर्चा झाली, मात्र त्याबाबत अद्याप मुख्यमंत्री आणि महा आधिवक्ता यांच्यासोबत उपमुख्यमंत्री चर्चा करतील आणि त्यानुसार निर्णय घेण्याचे ठरले आहे असे ते म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला होता.