फडणवीसांचे मानसिक संतुलन बिघडलेय; भाई जगताप यांची खरमरीत टीका

राज्यावर कोरोनाचे संकट कायम असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करतायत. जरा तपासून घ्या स्वत:ला अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना धारेवर धरले आहे.

  मुंबई : राज्यावर कोरोनाचे संकट कायम असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करतायत. जरा तपासून घ्या स्वत:ला अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना धारेवर धरले आहे.

  भाजपावर हल्लाबोल

  भाई जगताप यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला. केंद्र सरकार काही राजा नाही. त्यांनी सर्वांना मदत करायला हवी. आपली नैतिकता त्यांनी गुजरातला बांधली. गुजरातला मदत केली मग इतर राज्यांना का नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 हजार कोटींचे पॅकेज द्यावे. परंतु, त्यांचा महाराष्ट्रद्वेष पाहता ते काही देतील अशी अपेक्षा नाही,परंतु महाराष्ट्र सरकारने चांगली मदत करावी, असेही ते म्हणाले.

  सहा दिवसाच्या आंदोलनाची सुरुवात

  मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?’ या घोषणेवरुन देशात कॉंग्रसने भाजप विरुद्ध जोरदार लढाई सुरु केली आहे. त्यात जगताप यांनी भाजपविरोधात आंदोलनाचा इशारा दिला. भाजपाला सत्याचा सामना करावाच लागेल. उत्तर मुंबईतून या आंदोलनाची सुरुवात होईल, असे जगताप यांनी जाहीर केले. मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रात लसीकरण केंद्राबाहेर शंभर कार्यकर्ते आंदोलन करतील. त्यावेळी मास्क घालून मानवी साखळी तयार केली जाईल. पुढील ६ दिवस विरोध सुरु राहणार असल्याचे जगताप म्हणाले.

  लसीसाठी कोणताही करार नाही

  जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी देशात लसीकरण करुन घेतले. मात्र, भारतात पंतप्रधान कोरोना नष्ट झाला असे सांगत 93 देशांना लस विकतात. भाजपा नेते याचे समर्थन करतात. देशाचा लसीसाठी कोणताही करार नाही. मी देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करतो अशा शब्दात जगताप यांनी भाजपावर जोरदार टिका केली. मोदीजी, आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली? असा प्रश्न या आंदोलनातून विचारला जाणार आहे. यावेळी भाजपला सत्याचा सामना करावाच लागेल, असे आव्हान भाई जगताप यांनी दिले आहे.