जितेंद्र आव्हाड यांच्या नावे बोगस फेसबुक अकाऊंट : प्रोफाईलवर मोदींचा फोटो ?

राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नावेही फेक अकाऊंट सुरू असल्याचे समोर आले आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

 मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांची (Mumbai Police) बदनामी करण्यासाठी फेक अकाऊंटस् (fake account) तयार आल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नावेही फेक अकाऊंट सुरू असल्याचे समोर आले आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

फेसबुकवर हे बनावट खाते असून, प्रोफाईलला मोदींचा फोटो आहे. आव्हाड यांनी स्वतःच्या नावे सुरू असलेल्या फेक अकाऊंटची मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नावे फेसबुकवर हे अकाऊंट आहे. जितेंद्र आव्हाड साहेब असे अकाऊंटचे नावे असून प्रोफाईलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रभू रामचंद्र यांचा फोटो आहे. राम मंदिरही आहे. तर वॉलपेपरला मोदी यांचा जनतेला संबोधित करतानाचा फोटो आहे. आव्हाड यांनी या अकाऊंटची तक्रार महाराष्ट्र सायबर सेलकडे केली आहे.