शेअर बाजाराला कोरोना, सलग सहाव्या दिवशी बाजाराची आपटी

आज (शुक्रवारी) शेअर बाजार उघडताच बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हींमध्ये जोरदार विक्रीची लाट पाहायला मिळाली. सेन्सेक तब्बल ६०० अंशांनी तर निफ्टी २०० अंशांनी आपटला. सर्व क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीची जोरदार लाट पाहायला मिळाली. विशेषतः पेट्रोलिअम कंपन्यांचे समभाग आजच्या सत्रात सर्वाधिक गडगडल्याचं दिसलं. 

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीचे सावट शेअर बाजारावर जाणवायला सुरुवात झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून बाजारात सातत्याने घसरण नोंदवली जात आहे. कोरोना रुग्णांचे वाढते आकडे आणि अर्थव्यवस्थेसमोरचं संकट गडद होत असल्याची लक्षणे शेअर बाजारावर जाणवायला सुरुवात झाली आहे.

    आज (शुक्रवारी) शेअर बाजार उघडताच बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हींमध्ये जोरदार विक्रीची लाट पाहायला मिळाली. सेन्सेक तब्बल ६०० अंशांनी तर निफ्टी २०० अंशांनी आपटला. सर्व क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीची जोरदार लाट पाहायला मिळाली. विशेषतः पेट्रोलिअम कंपन्यांचे समभाग आजच्या सत्रात सर्वाधिक गडगडल्याचं दिसलं.

    गेल्या वर्षी कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारांंमध्ये विक्रीची जोरदार लाट पाहायला मिळाली होती. विक्रमी टप्प्यावरून गडगडून सेन्सेक्स आणि निफ्टीनं विक्रमी निचांकी पातळी नोंदवली होती. त्यानंतर पुन्हा उसळी घेत पुढील सहा महिन्यात पूर्वीची उच्चांकी पातळी तोडत नवा विक्रम नोंदवला होता. आता कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचा परिणाम शेअर बाजारावर जाणवू लागल्याचं चित्र निर्माण झालंय.

    निफ्टी सध्या १४ हजाराच्या पातळीपासून ३०० ते ४०० अंश दूर आहे. निफ्टीची पातळी जर याहून घसरली, तर मात्र बाजारात मोठी पडझड पाहायला मिळू शकते, असा अंदाज शेअर बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सर्वसामान्यांनी मात्र या पडझडीकडं गुंतवणुकीची सधी म्हणूून