प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबईत रुग्णसंख्या चिंताजनक वाढत असताना रुग्णदुपटीच्या कालावधीत होणारी घसरणही चिंताजनक आहे. आठवडाभरात रुग्णदुपटीचा कालावधी ११५ दिवसांनी घसरला आहे. रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णदुपटीचा कालावधी कमी होत होता. २० फेब्रुवारीला रुग्णसंख्या ८९७ पर्यंत वाढली असताना रुग्णदुपटीचा कालावधी ३७१ दिवसांवर आला.

    मुंबई (Mumbai). मुंबईत रुग्णसंख्या चिंताजनक वाढत असताना रुग्णदुपटीच्या कालावधीत होणारी घसरणही चिंताजनक आहे. आठवडाभरात रुग्णदुपटीचा कालावधी ११५ दिवसांनी घसरला आहे. रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णदुपटीचा कालावधी कमी होत होता. २० फेब्रुवारीला रुग्णसंख्या ८९७ पर्यंत वाढली असताना रुग्णदुपटीचा कालावधी ३७१ दिवसांवर आला. मात्र आठवडाभरात रुग्णसंख्या हजाराच्या पार गेली असताना रुग्णसंख्याही ११५ दिवसांनी घसरली आहे. शुक्रवारी २६ फेब्रुवारी रोजी रुग्णसंख्या १०३४ असताना रुग्णदुपटीचा कालावधी १५६ दिवसांपर्यंत खाली घसरला होता.

    मुंबईत आटोक्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या १० फेब्रुवारीपासून वाढते आहे. रोज १०० ते दीडशेहून अधिक रुग्ण वाढत आहेत. बुधवारी ११६७ पर्यंत वाढलेली रुग्णसंख्या गुरुवारी ११४५, तर शुक्रवारी २६ फेब्रुवारीला १०३४ पर्यंत घसरली. एकीकडे कोरोनाबाधितांची त्याचबरोबर रुग्णदुपटीच्या कळवा परंतु हजारांचा पार असल्याने चिंता कायम होती.

    कोरोना रोखण्यासाठी पालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, क्लोज कॉन्टॅक्टचा तात्काळ शोध, नियमांची कठोर अंमलबजावणी होत आहे. रुग्णांची संख्या वाढतच गेली तर आवश्यक यंत्रणाही पालिकेने सज्ज ठेवली आहे. सध्या रोज १२ हजारांपर्यंत चाचण्या करण्यात येत आहेत, पण हीच संख्या १५ ते २० हजारापर्यंत वाढविण्याची प्रशासनाची तयारी आहे.